कोरोनाच्या महामारीत प्रत्येकांनी आपली खोटी प्रतिष्ठा जपपण्यासाठी वाढदिवस , सोहळे, यावर खर्च न करता सामाजिक भान ठेवून समाज कार्य करावे. -- रामदास पाटील.
मुक्रमाबादेत, ५५ जनांनी केले रक्तदान ...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
दि १२ महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाने भितीचे वातावरण पसरले असून नांदेड जिल्ह्यातील ब्लड बँकेत रक्तसाठा अपुरा असल्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मिञ परिवाराच्या वतीने मुखेड, कंधार, देगलूर या तालुक्यात सोमवार दि१२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल ३५० जणांनी रक्तदान करून रामदासजी पाटील सुमठाणकर ,यांचा वाढदिवस साजरा केला.
महाराष्ट्रातील जवळपास सर्व ब्लड बँकेत रक्त साठा अपुरा असल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , यांनी रक्तदान करा व गोर गरीब जनतेचे प्राण वाचवा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रामदासजी पाटील सुमठाणकर, यांनी आपला वाढदिवस हा, केक , हार, तुरे आतिषबाजी करून जल्लोषात साजरा न करता ठिकठिकाणी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याचे आपल्या मिञ परीवाराला सांगितले. मिञ परीवारानेही अशा कोरोनाच्या भयाण परिस्थितीत रामदास पाटील सुमठाणकर.यांच्या सुचनेचे पालन करत "गरजूंसाठी मदतीचा हात" हा उपक्रम राबवत, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद , बा-हाळी. दापका(गं) जाहुर, कंधार तालुक्यातील पेठवडज. दिग्रस व देगलुर येथे रक्तदान शिबीर घेतले . या शिबिरात तब्बल ३५० रक्तदान करून रामदास पाटील सुमठाणकर, यांचा वाढदिवस साजरा करून समाजा समोर एक आदर्श निर्माण केला. आज घडीला गाव तिथे कोरोनाचे रूग्ण आहेत. अशा परिस्थितीतही रामदास पाटील सुमठाणकर , मिञ परीवाराने आपली सामाजिक बांधिलकी तेवत ठेवत गाव, वाडी .तांड्यावर फिरून कोरोनाच्या या महामारीत रक्तदान करणे किती महत्त्वाचे आहे. हे, पटवून देऊन रक्तदान शिबीर यशस्वी केले. या रक्तदान शिबीरात शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही याची आयोजकाकडून पालन करण्यात आले. रक्तदान शिबीराच्या प्रवेश द्वाराला. सॕनेटायझर ठेवण्यात आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्याला मास्क व सामाजिक अंतर ठेवून एका वेळेला फक्त चार रक्तदात्यांना आत प्रवेश देण्यात येत होते.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी रामदासजी पाटील सुमठाणकर , मिञ परीवाराने परिश्रम घेतले.
:-: कोरोनाच्या काळात रूग्णांना वेळेवर रक्त मिळून त्याचे प्राण वाचणे, हे, माझ्यासाठी महत्त्वाचे .:-:
सर्वञ कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या कोरानामुळे ब्लड बँकेत रक्तसाठा नसल्यामुळे उपचारासाठी वेळेवर रक्त पिशवी मिळत नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या अशा भयाण परिस्थितीत वाढदिवस मोठा साजरा करणे हे, माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. या रक्तदान शिबिरातून झालेल्या रक्त संकलनातून गरीब रुग्णांना वेळेवर रक्त मिळून उपचार झाला तर तेच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरती.
-- रामदास पाटील सुमठाणकर, प्रशासकीय अधिकारी हिंगोंली...
:: याठिकाणी झाले रक्तदान शिबिर...:-:
मुखेड, मुक्रमाबाद ,देगलूर'जाहुर,पेठवडज,
दिग्रस, बाराहली ,दापका याठिकाणी ३५० जणांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत व सामाजिक अंतर ठेवून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत रक्तदान केले.

COMMENTS