धर्मबाद (अहमद लड्डा)
सर्वाना यापूर्वीच कोरोनासारख्या भयंकर आजाराने ग्रासले आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत धर्माबाद शहरातील समतानगर व रामनगर येथील नाले स्वच्छते अभावी जाम झाले आहेत. रस्त्यावर येणारे नाल्यांचे घाणेरडे व वासाड़ पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत असून वरुन डासांची संख्या वाढत आहे. डास चावल्यामुळे मलेरियाची भीती निर्माण होत आहे. म्हणूनच समतानगर व रामनगर येथील भरलेल्या नाल्यांमधील घाण बाहेर काढून शहर स्वच्छ व घाण मुक्त करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखेच्यावतीने नगरपालिका कार्यालयासमोर 'चिखल फेक' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. न पा चे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेने के तालुका अध्यक्ष नागनाथ माळगे, शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड, शहर उपाध्यक्ष गजानन मुंडेवाड, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष लोकडोबा कावडे, माजी तालुका अध्यक्ष दत्ता पा. कवडे आणि वाहतुक आघाडी तालुका अध्यक्ष सुगत पहेलवान यांच्या स्वाक्षर्या आहेत.

COMMENTS