प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था मागिल काही महिन्यांपासून रामभरोसे सुरू असुन कोरोना काळात कोविड वार्डात आपल्या जिवाची पर्वा न करता डाँक्टर व नर्स रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. मात्र कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असल्याने घडलेल्या घटनेवरून निदर्शनास येत आहे. यामुळे कोविड वार्डात कर्तव्य बजावणाऱ्या डाँक्टर व नर्स आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रूग्ण संखेत प्रचंड वाढ होत असुन रूग्णाच्या म्रुत्युचा ही आकडा वाढतच आहे. शनिवारी संध्याकाळी कोविड वार्डात उपचार घेत असलेल्या एका महिला पेशंटचा म्रुत्यु झाला होता. यावेळी सदर महिलेच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करीत कोरोणा वार्डात प्रवेश करून व्हेंटिलेटर मशीन चे काच फोडून, वार्डात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. तसेच वार्डातील ईतर पेशंटच्या नातेवाईकांना ही शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी जिल्हा सामान्य रूग्णालयातील पोलिस चौकित घटनेची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत हा प्रकार कशामुळे घडला हे कळू शकले नाही. मात्र मागिल काही महिन्यात अशा घटना वारंवार रूग्णालयात घडत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की येथे आलेल्या युवकांनी कर्मचारी यांना शिवीगाळ करीत वेंटिलेटर च्या काचा फोडल्या आहेत परंतु असे नुकसान का केले या संदर्भात या विभागाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सामान्य रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढविण्यात यावा अशी मागणी रूग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यां कडुन होत आहे.

COMMENTS