नायगाव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुर्ण राज्यात १५ एप्रिल ते १ मे पर्यंत १४४ कलम संचारबंदी लागू केली आहे कडक निर्बंधासह नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले यामुळे विनाकारण बाहेर फिरता येणार नसल्याने छोट्या,छोट्या व्यापाऱ्यांना व मजूरदारांना याचा फटका बसला असून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी कर्ज घेतलेल्या प्रावेट फायनान्स,मायक्रो फायनान्स चे हाप्ते भरण्याची मोठीं अडचण निर्माण झाली असून लॉकडाऊन घ्या काळात मायक्रो फायनान्सवर तात्पुरती बंदी घालून त्यांच्याकडून करण्यात येणारी वसूली थांबवावी अशी मागणी आसीफ नरसीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
छोटे -मोठे धंदे वाल्यानी आपला रोजगार चालवण्यासाठी मायक्रो फायनान्स (प्रायवेट फायनस) महिलांच्या नावे उचलून उदरनिर्वाह चालवत असतात व नियमित परतफेड हि करतात परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आल्याने व महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक होताना दिसत आहे यामूळे या महामारीला रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ब्रेक द चेन,कडक निर्बंधासह नियमावली जाहीर करण्यात आले असून १५ एप्रिल ते १ मे पर्यंत पुर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे याकाळात लोकांनी घराबाहेर न पडता घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहेत यामुळे गोर गरीब जनता हाताला काम मिळत नसल्याने घरीच बसले आहेत तर छोटे छोटे व्यापाऱ्यांचे दुकाने बंद असल्याने त्यांचा व्यवहार ठप्प झाला आहे आपला उदरनिर्वाह व व्यापार चालवण्यासाठी काही प्रावेट फायनान्स,मायक्रो फायनान्स कडून आठवडा,पंधरवडा व महिनेवारी असे महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेकांनी कर्ज घेतले आहे यामुळे या लोकांना संचारबंदीचा मोठा फटाका बसला आहे त्यांची दुकाने व व्यवहार पुर्णतः बंद असल्याने प्रायवेट फायनान्स वाल्याकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली कारण कमावता माणूसच रिकामा घरी बसल्याने तो हैराण झाला आहे पोटाचाच प्रश्न समोर असल्याने कर्जा चे हप्ते भरणे शक्य नसल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे मात्र सदर कंपणी व मायक्रो फायनान्स कडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे वसूलीसाठी ठरवलेल्या दर आठवड्याला बैठकीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व महिला एकत्रित जमा होत असल्यामूळे संचारबंदीचा उल्लंघनही होत आहे यामुळे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी वरील सर्व बाबींचा विचार करून संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात विविध मायक्रो फायनान्स (प्रायवेट फायनान्स) यांच्याकडून कडून करण्यात येणारी सक्तीची वसूली थांबवावी व गोर गरीब जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शेख आसिफ नरसीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे
COMMENTS