सोनपेठ/प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे.यात राशन दुकानदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीही प्रशासननाने राशन दुकानदार...
राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे.यात राशन दुकानदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीही प्रशासननाने राशन दुकानदारांना संरक्षित किट आणि कोरोना रोखण्यासाठी करण्यात
येणाऱ्या पीपीई किट,इतर साहित्य न देता धान्य नियमित वाटप करण्यात येत आहे.तालुक्यातील तीन राशन दुकान निलंबित करुन अन्याय केला असल्याचे मत राशन दुकानदार संघटनाचे तालुकाध्यक्ष मारोती पवार यांनी व्यक्त केले आहे.यावेळी त्यांनी सांगितले की,ज्या दुकानातून संपुर्ण धान्याचे वितरण करण्यात आले आहे.त्या राशन दुकानदारांने केवळ मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे रेकॉर्ड संरक्षित ठेवता आले नाही.ही बाब देखील प्रशासनाने मनावर घेतली पाहिजे असा एकतर्फी निर्णय देऊन दुकानदारासह लाभार्थ्यावर प्रशासनाकडून एकप्रकारे अन्याय होत असून राशन दुकानदार यांचे रेकॉर्ड संकट काळात देखील ७० ते ८० टक्के आहे.मागील महीन्यात धान्य शासनाच्या आदेशानुसार मजुरांना धान्य वाटप करण्यात आले आहे.मात्र मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वाटपाचे रेकॉर्ड आद्ययावत झालेले नाही.या कारणाने तालुक्यातील तीन राशन दुकानचे परवाने निलंबित करण्यात आले आहे ही कार्यवाही रद्द करण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.यासोबतच राशन दुकानदार संघटना संप पुकारेल असा इशारा देखील पवार यांनी दिला आहे.

COMMENTS