ल
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष ) यांचे आज मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांना 25 दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आ.अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाले होते.तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते.नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले.
मागील 8 दिवसापासून ते अत्यवस्थ होते.
अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते.अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आमदार अंतापूरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

COMMENTS