*मस्साजोग येथील स्वराज पेट्रोल पंपा समोरील घटना
*मस्साजोग प्रतिनिधी*
*केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्वराज पेट्रोल पंपा समोर दिनांक ९ एप्रिल शुक्रवार रोजी साडेदहाच्या सुमारास इनोव्हा या चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे*
याबाबत ची अधिक माहिती अशी की केज-माजरसुंबा महामार्गावर असलेल्या मस्साजोग येथील स्वराज पेट्रोल पंपा समोर इनोव्हा क्रमांक एम एच 14 सी एक्स 3266 वाहनाच्या धडकेत दुचाकी क्रमांक एम एच ४४ पी ७४४५ या दुचाकी वरील जीवन वैजनाथराव देशमुख वय ६७ वर्षे हे मस्साजोग येथील बस स्टॅण्ड वरून शेतात जात असताना इनोव्हा या चारचाकी वाहनाने एच एफ डिलक्स या दुचाकीला समोरच्या बाजूला धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता म्हणून मस्साजोग येथील संदीप बाबासाहेब देशमुख हा तरुण जखमी ला मदत करण्यासाठी जात असताना त्या तरुणाला काही न विचारता पोलिसांनी बदडले व अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वारावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत

COMMENTS