नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
दैनिक सकाळ वर्तमान पत्राच्या माध्यमातून
समाजातील तळागळात अतिशय दूरदृष्टी ठेवून संपूर्ण घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व ग्रामीण भागातील व्यथा त्यांच्या लेखनातून जनते समोर मांडणारे तळमळीचे पत्रकार तथा प्रसिद्ध लेखक साहित्यिक तथा गावाकळा कांदबरीचे जनक दिवंगत प्रदिप धोंडिबा पाटील जाधव कामरसपल्लीकर यांना नायागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील कवी व साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे मत मराठी पञकार संघ तालुका नायगांव येथील सर्व पञकार बांधवांनी
व्यक्त केले आहे . ग्रामीण कवी व पञकार. साहित्यिक म्हणून परिचित असलेले साईबाबा प्राथमिक विद्यालय शंकर नगर रामतिर्थ शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रदीप धोंडीबा पाटील यांचे अकाली निधन झाले ते सन 1992 पासून कार्यरत होते त्यांना लिखाण वाचनची सवय होती त्यांच्या गावकळा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार ही मिळाला होता
बिलोली तालुक्यातील कामरसपल्ली असलेले जेष्ठ पत्रकार तथा माजी मुख्याध्यापक प्रदिप धोंडिबा पाटील कामरसपल्लीकर हे साईबाबा प्राथमिक विद्यालय शंकरनगर येथे सन 1992 पासून शिक्षक पदावर कार्यरत होते त्यांना लिखाण वाचन ची सवय होती त्यांच्या गावकळा कादंबरीत वास्तव समोर आणून ग्राम स्वच्छता अभियानाचे योगदान या कादंबरीने समाजाला दिला असून होरपळ सारखा कसदार कथासंग्रह,कवितासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार बरोबर अनेक पुरस्कार मिळाले होते.व रेतीवाला नवरा पाहिजे मला या सारखे लिखाण केले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
'नामांकित पत्रकाराचे निधन ' अन 'पत्रकारात शोकाकुल वातावरण
----------- ------------------------
कवी साहित्यिक शिक्षक काळाच्या पडद्या आड गेल्यामुळे प्रदीप पाटील यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सर्व पञकार बांधव सहभागी आहोत व त्यांच्या कुटुंबीयास या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो व प्रदिप पाटील त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.करून मराठी पञकार संघ तालुका नायगांव यांच्या वतीने अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे

COMMENTS