जिल्हाधिकारी विपिन इटणकर व महापालिका आयुक्त सुनील लहाने यांची उपस्थिती
---------------------------------------
नांदेड- कोरोणा रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालय देखील अपुरे पडत आहेत. यामुळे प्रशासनाने 200 खाटाचे नवे जम्बो कोव्हिड केअर सेंटर, भक्ती लॉन्स येथे उभारण्याचे काम सुरू केले आहे. याची पाहणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केली आहे. हे कोव्हिड केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी आ. कल्याणकर यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने हे उपस्थित होते.
सध्या शहरात कोरोणाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याकारणाने रुग्णांना बेड देखील उपलब्ध होत नाही. त्या बरोबरच गंभीर रुग्णांना रेमडीसिविर या इंजेक्शनचा देखील तुटवडा भासत आहे. यामुळेच प्रशासनाने शहरात नवे 200 खाटाचे जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू केले आहे. याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. याची पाहणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी विपिन इटणकर व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्त सुनील लहाने हे उपस्थित होते. आ. बालाजी कल्याणकर यांनी सर्व कामाचा आढावा घेतला असून प्रशासनाने लवकरात लवकर हे सेंटर सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसेच रुग्णांनी देखील भीती न बाळगता रुग्णालयात जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. आजार अंगावर काढल्याने आजार वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील कोरोना सारखी लक्षणे दिसत असतील तर त्यांनी समोर येऊन तात्काळ तपासणी करून घ्यावी. जेणेकरून आपल्यासह आपल्या घरांतिल नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. जम्बो कोव्हिड केअर सेंटर जर रुग्णांना अपुरे पडले तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नव्या कोव्हिड केअर सेंटरची मागणी करणार असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांनी संगितले आहे. रेमडीसिविर हे इंजेक्शन साठी देखील आ. बालाजी कल्याणकर यांनी आरोग्य मंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांनीदेखील लवकरच इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे देखील त्यांनी आव्हान केले आहे.
*हैदरबाग येथे 50 खाटाचे नवे कोव्हिड केअर सेंटर
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता रुग्णांना बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर हैदरबागेतील रुग्णालयात देखील 50 खाटाचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याबाबतची तयारी देखील प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे .अशी माहिती यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांना प्रशासनाकडून देण्यात आली.

COMMENTS