सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील सोनपेठ आणि पाथरी तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या श्रीक्षेत्र मुदगल येथील मुदगलेश्वर मंदिराच्या परिसरात बाहेरुन येणाऱ्या भाविकांची गर्दी होत असल्याने कोरोनाचा फैलाव होत असून हा फैलाव रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाला योग्य निर्देश देऊन फैलाव रोखण्यासाठी दखल घेण्याची मागणी मुदगल येथील सरपंच प्रतिनिधी लक्ष्मण केंद्रे यांनी केली आहे.याबाबत ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी सूचना देऊनही मंदिर व्यवस्थापन समिती सूचनांचे पालन करत नसल्याने केंद्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मुदगलेश्वर येथील मंदिर बंद आहे.मात्र सदर मंदिर परिसरात करण्यात येणारे विधी चालूच आहेत यात दशक्रिया विधी,नागनारायण बळी,त्रिपिंडी कार्य,आदींसह विविध धार्मिक कार्य करण्यात येत आहेत यासाठी पुणे,मुंबई, औरंगाबाद,नागपूर,बीड,परळी,ठाणे जिल्ह्यातुन विधीसाठी येणारे लोक आहेत यात एका विधीसाठी १०० ते २०० लोक एकत्र येऊन सदरचा विधी करतात हा विधी करत असताना कसल्याही प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन विधी करत नसल्याने शासनाच्या संचारबंदीचा बोजवारा उडत असल्याचेही केंद्रे यांनी सांगितले.
COMMENTS