*कोविड विषयक कामगार नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनांचे सचिन अहिर आणि कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी स्वागत केले आहे.सचिन अहिर यांनी बैठकीत सुचना करताना म्हटले आहे की, ●शासनाने लॉकडाऊन काळात बांधकाम सारख्या* *क्षेत्रातील असंघटित कामगारांना महिना १५०० रुपये मदत जाहीर कली आहे.पण हा लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास हि मदत पुढील महिन्यातही त्याच असंघटित कामगारांना लागू करावी,●शासनाने कारखान्यातील कामगारांसाठी स्थानिक नगरपालिकेच्या मदतीने "कोविड लसीकरणा"बरोबर "कोविड उपचार सेंटरची" स्थापन करण्यास कारखान्याला भाग पाडावे.ज्या मुळे तिकडच्या तिकडे कामगारांवर इलाज करणे सोपे होऊन शासन आणि प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल,●इन्शुरन्स मेडिकल स्कीम कोविडच्या आजावरच स्वतंत्रपणे लागू करावी,जेणेकरून कामगारांना धीर येऊन,या मेडिकल कोविड स्कीम मधून आपण आपल्या आजाराचा खर्च भागवू शकू,असा विश्वास वाटेल!●शासनाने गत वर्षाप्रमाणे लॉकडाऊनच्या काळातील सर्व आस्तापनामधील कामगारांना वेतन देणारा अध्यादेश काढावा*
*या सर्व सूचनांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विचार करण्याचे सूचित केले आहे.*
★★★★ "

COMMENTS