नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव येथील जनता हायस्कुल च्या हिंदी विषयाच्या अभ्यासू अध्यापिका श्रीमती साजिदा वाहिदोद्दीन चॉईन मॅडम यांचे दि 21 एप्रिल रोज बुधवार सकाळी 9 वाजता हैद्राबाद येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्या 49 वर्षाच्या होत्या
श्रीमती साजिदा वाहिदोद्दीन चॉईन मॅडम या येथील जनता विद्यालयात हिंदी विषयाच्या उत्कृष्ट शिक्षिका होत्या.त्यांच्या अध्यापन कौशल्यामुळे त्यांच्याबद्दल विद्यार्थी वर्गात अत्यन्त आदराची भावना दिसून येत होती,त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पती,दोन मुली ,एक मुलगा ,असा परिवार होता,त्यांनी आपल्या दोन अपत्त्यांना यापूर्वी डॉक्टर बनविले,तर तिसऱ्या अपत्त्याचीही त्याच मार्गावर वाटचाल सुरू असतानाच त्यांचे आकस्मिक निधन झाले, त्यांच्या निधनाने चॉईन परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.त्या पळसगाव ता. नायगांव येथील शिक्षक वहिदोद्दीन चॉईन सर यांच्या सुविद्य पत्नी होत.त्यांच्या अकाली निधनामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS