नवीन नांदेड: नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील एनडी-४२, ज्ञानेश्वर नगर परिसरातील रहिवासी तथा इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ...
नवीन नांदेड: नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील एनडी-४२, ज्ञानेश्वर नगर परिसरातील रहिवासी तथा इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. कौशल्या बाबूराव गिते-काळे (वय-४२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २३ एप्रिल रोजी पहाटे उपचारादरम्यान, नांदेड येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात निधन झाले. दिवंगत प्रा. डॉ. कौशल्या गिते-काळे यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी दुपारी 'सिडको' वसाहतीतील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पती, दोन मुले, दोन बहिणी व मेहुणा असा परिवार आहे. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी संजय काळे यांच्या 'त्या' पत्नी होत.

COMMENTS