नांदेड: नांदेडच्या स्वप्नजा गार्डन परिसरातील 'झेंडा' चौक भागातील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक रोहिदासराव गोविंदराव गच्चे (वय-९० वर्षे) य...
नांदेड: नांदेडच्या स्वप्नजा गार्डन परिसरातील 'झेंडा' चौक भागातील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक रोहिदासराव गोविंदराव गच्चे (वय-९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ एप्रिल रोजी दुपारी निधन झाले. दिवंगत रोहिदासराव गच्चे यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई तसेच नातवंडे असा परिवार आहे. नांदेड जि. प. चे सहशिक्षक मधुकर गच्चे तसेच महावीर सोसायटी, नांदेड येथील नरसिंह विद्यामंदिर माध्यमिक शाळेतील संगीतशिक्षक तथा 'लॉर्ड बुद्धा' टी.व्ही.चे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांचे 'ते' वडील होत.

COMMENTS