*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश प्रभारी महावीर सोनवणे यांच्या हस्ते मास्क व सॉनिटाॅयजरचे ग्रामस्थांना वाटप.*
*अनंत जाधव /केज*
*केज तालुक्यातील मस्साजोग येथे विविध ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून महामानव विश्वरत्न बोधिसत्व व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.*
याबाबत ची अधिक माहिती अशी की मस्साजोग येथील समाज मंदिर , ग्रामपंचायत कार्यालय, महावितरण कार्यालय, कृषी कार्यालय, येथे १३० व्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामस्थांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निकाळजे गटाचे मुंबई प्रदेश प्रभारी महावीर डी सोनवणे , सरपंच संतोष अण्णा देशमुख, शिरिष देशमुख, नवनाथ सोनवणे, सुभाष सोनवणे, जालिंदर सोनवणे, प्रकाश मामा बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निकाळजे गटाचे केज तालुका अध्यक्ष सुशिल सोनवणे, यांच्या हस्ते सोशल डिस्टिंन्सचे काटेकोर पालन करून मस्साजोग ग्रामस्थांना मास्क ,सॉनिटॉयजरचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित समाधान डोंगरे, श्रीराम गायकवाड, अरूण सोनवणे, स्वप्नील सोनवणे ,संघपाल सोनवणे,सौरभ सोनवणे,सचिन मुंडे, पत्रकार अनंत जाधव, योगेश शिंनगारे,अशोक सोनवणे,मधुकर सोनवणे, विजय सोनवणे, पत्रकार सतीश जाधव, सुरेश सोनवणे, गंगाराम सोनवणे, सुधाकर सोनवणे, लक्ष्मण सोनवणे,बबन तात्या सोनवणे, श्रीकांत सोनवणे, संदीप देशमुख, दिलीप घाटुळ, यशवंत सोनवणे, सचिन सोनवणे, सदाशिव सोनवणे, धनंजय देशमुख, रमेश सोनवणे, भैय्या सोनवणे, बालासाहेब मुंडे, अक्षय सोनवणे, , सुभाष सोनवणे, जालिंदर जावळे, मनोज सोनवणे , अमोल सोनवणे, बुद्धभुषण सोनवणे, अखिल सोनवणे, प्रशांत सोनवणे, बापुराव वाघमारे,शिओम सोनवणे, इत्यादींच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

COMMENTS