*अनंत जाधव /मस्साजोग*
*बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसांदिवस वाढत आहे व केज तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.*
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मस्साजोग येथे एका आठवड्यात कोरोना बाधिताचा रुग्णांचा आकडा ६१ वर पोहोचला होता मात्र ६१ पैकी १५ कोरोना रुग्णांनी दोन दिवसात कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत तर १६ जण मस्साजोग येथे होम होमक्वरांनटाईन करण्यात आले आहेत व काही रूग्ण पिसेगाव येथील कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत व एक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तरी मयताचे नाव ब्रांचपोस्टमास्टर (B.P.M) आत्माराम रानबा शिंदे वय ६२ वर्षे रा .मस्साजोग यांचे दिनांक १८ रविवार रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोंविड सेंटर येथे उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे व आत्माराम शिंदे आठ दिवसांपूर्वी मस्साजोग येथील पोस्ट कार्यालयात कार्यरत असताना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,एक सुन असा छोटा शिंदे परिवार आहे व त्यांच्यावर अंबाजोगाई येथील पठाण माडवा येथील स्मशानभूमीत नातेवाईकांच्या व डॉक्टरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला
*चौकट-*
घाबरू नका खबरदारी घ्या .आज पासुन अत्यावश्यक सेवा दवाखाना, मेडिकल वगळता सर्व काही 8 दिवसासाठी बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच अश्विनीताई संतोष (आण्णा )देशमुख यांनी केले आहे व बाहेर गावावरून येणारे सर्व व्यापारी भाजीपाला विक्रेते यांना गावात येण्यास सक्त मनाई केलेली आहे.तोंडाला मास्क वापरा विनाकारण घरा बाहेर फिरू नका अशा सुचना देखील ग्रामपंचायत कार्यालय कडून गावातील ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.
*सौ .अश्विनीताई संतोष आण्णा )देशमख*
*सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मस्सजोग
केज तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे जे रुग्ण कोरोना बाधित आहेत
त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व नागरिकांनी न घाबरता लवकरात लवकर करोनाची चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण सर्व मिळून कोरोनाची साखळी तोडू शकतो . जे कोणी कोरोना बाधित आहेत त्यांनी ही आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती आरोग्य विभागाला देऊन कोरोना साखळी तोडण्यास प्रशासनाला मदत करावी.तसेच जर एखाद्या व्यक्तींला सर्दी, खोकला,ताप,घसा दुखणे ,दम लागणे,पोट बिघडणे,अंग दुखणे, अशी काही लक्षणे असतील तर अंगावर न काढता किंवा परस्पर औषधे न घेता कोरोनाची चाचणी करून घेतली तर आपल्या स्वताच्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या तसेच इतर नागरिकांना आपण सुरक्षित ठेऊ शकू.टेस्ट केल्याने कोरोना आहे का नाही हे समजून जाते व लागलीच औषोधोपचार करण्यास मदत होते आणि पुढील गुंतागुंती जसे मृत्यू सारखे धोके टाळता येऊ शकतात.नागरिक जेवढ्या लवकर कोरोनाची चाचणी करून घेतील तेवढ्या लवकर मृत्यूचा आकडा कमी होईल तसेच कोरोनाचा प्रसार ही कमी करण्यास मदत होईल तेव्हा नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे,जसे की सोशल डिस्टन्सीगचे नियम पाळावे, मास्क नाका-तोंडाला लावणे , सॉनिटायझरचा वापर करणे , विनाकारण घराच्या बाहेर पडु नये व तसेच मा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब यांच्या आदेशानुसार सर्व गावामध्ये मिशन झिरो डेथ अंतर्गत सर्वेक्षण दि 19 एप्रिल ते 10 मे पर्यंत राबविण्यात येणार असून यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या कर्मचार्याना अचूक माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांचे ही काटेकोरपणे पालन करावे.
*डॉ विकास आठवले*
*तालुका आरोग्य अधिकारी केज.*

COMMENTS