*जे कोणी कोरोना बाधित आहेत त्यांनी ही आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती आरोग्य विभागाला देऊन कोरोना साखळी तोडण्यास प्रशासनाला मदत करावी.*
*केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले यांचे आवाहन.*
*अनंत जाधव /मस्साजोग -*
*केज तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे जे रुग्ण कोरोना बाधित आहेत*
त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व नागरिकांनी न घाबरता लवकरात लवकर कोरोनाची चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण सर्व मिळून कोरोनाची साखळी तोडू शकतो . जे कोणी कोरोना बाधित आहेत त्यांनी ही आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती आरोग्य विभागाला देऊन कोरोना साखळी तोडण्यास प्रशासनाला मदत करावी.तसेच जर एखाद्या व्यक्तींला सर्दी, खोकला,ताप,घसा दुखणे ,दम लागणे,पोट बिघडणे,अंग दुखणे, अशी काही लक्षणे असतील तर अंगावर न काढता किंवा परस्पर औषधे न घेता कोरोनाची चाचणी करून घेतली तर आपल्या स्वताच्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या तसेच इतर नागरिकांना आपण सुरक्षित ठेऊ शकू.टेस्ट केल्याने कोरोना आहे का नाही हे समजून जाते व लागलीच औषोधोपचार करण्यास मदत होते आणि पुढील गुंतागुंती जसे मृत्यू सारखे धोके टाळता येऊ शकतात.नागरिक जेवढ्या लवकर कोरोनाची चाचणी करून घेतील तेवढ्या लवकर मृत्यूचा आकडा कमी होईल तसेच कोरोनाचा प्रसार ही कमी करण्यास मदत होईल तेव्हा नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे,जसे की सोशल डिस्टन्सीगचे नियम पाळावे, मास्क नाका-तोंडाला लावणे , सॉनिटायझरचा वापर करणे , विनाकारण घराच्या बाहेर पडु नये व तसेच मा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब यांच्या आदेशानुसार सर्व गावामध्ये मिशन झिरो डेथ अंतर्गत सर्वेक्षण दि 19 एप्रिल ते 10 मे पर्यंत राबविण्यात येणार असून यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या कर्मचार्याना अचूक माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांचे ही काटेकोरपणे पालन करावे असे ही आवाहन असे आवाहन केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले यांनी केले आहे .
COMMENTS