- इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने व्यापाऱ्यांचे आंदोलन
माजलगाव/भास्कर गिरी
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने अत्यावशक सेवा चालू करून इतर व्यवसाय बंद करून लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला असून बाकीच्या व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने माजलगाव शहरात दि. १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सर्व व्यापाऱ्यांनी शिव भोजन करून सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे.
भारत देशात कोरोना विषाणू ची वाढ होऊ नये म्हणून एप्रिल २०२० मध्ये केंद्र सरकारने लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी व्यापाऱ्यांनी लॉक डाऊन चांगला प्रतिसाद दिला त्यावेळेस सर्व कडकडीत बंद देऊन सरकारला सहकार्य केले तर काही अन्नद्रव्यांनी सामाजिक बांधिलकी जपून गोरगरिबांना किराणा किट देऊन सरकारला सहकार्य केले. २०२० मध्ये कोरोना वर मत करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी कळ सोसली परंतु आज अत्यावश्यक चालू ठेवल्याने व इतर व्यवसाय बंद केल्याने कोरोना कमी होणार आहे का ? आज पण माजलगाव शहरात गर्दी कायमच आहे. मग कोरोना ची महामारी कमी होईल का ? हातावर पोट असणाऱ्या लहान-लहान व्यापाऱ्यां वर उपासमारीची वेळ आली आहे. ठाकरे सरकारने बाकीच्या व्यापाऱ्यांला सावत्र वागणूक दिली असल्याने व्यापाऱ्यांचे संतापाची लाट निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवा चालू करून मात्र बाकी व्यावसायिका वर उपासमारीची वेळ आली आहे. अत्यावशक सेवा चालू करून इतर व्यवसाय बंद करून कोरोना जाईल का ?
जशी अत्यावश्यक चालू केली तसे इतर व्यवसाय चालू करा नसता सर्व व्यवसाय बंद करून कडक लॉक डाऊन करा असे व्यापारी वर्गात बोलत आहेत.

COMMENTS