*नांदेडच्या राजकीय पटलावरील एक संघर्षशील व लढवय्य नेतृत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक व सर्वाधिक काळ शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख राहीलेले, शिवसैनिक म्हणून प्रत्येक आंदोलनात सर्वात पुढे असणारे, अनेक कार्यकर्त्यांना घडविणारे व सर्वसामान्यातुन पुढे आलेले नेतृत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असलेले प्रकाशभाऊ कौडगे यांचे आज हैद्राबाद येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले*
कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ गेला, अडचणीत असलेल्याना एका फोन वर अर्ध्या रात्री मदत करणारा नेता अशी प्रकाशभाऊ यांची प्रतिमा होती. त्यांच्या दुःखद निधनाने सर्वसामान्यांचा आधारवड संपला अशा भावना जड अंतकरणाने व्यक्त होत आहेत.
शिवसेनेत दीर्घकाळ नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती, त्यानंतर या नितिन गडकरी.स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या सोबत भाजप मध्ये ही ते काही काळ कार्यरत होते. त्यानंतर ते मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होते.

COMMENTS