*राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष* नागेंद्र पाटील चोळाखेकर * *यांची मागणी*
धर्माबाद (अहमद लड्डा)
जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा हाहाकार झाला असून यामध्ये जिल्ह्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर इंजेक्शन अत्यावश्यक असून ते इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही असे दाखवून दुकानदार चढ्या भावाने या इंजेक्शनची विक्री करत आहेत. त्यामुळे अशा साठेबाजांवर कार्यवाही करून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पा कदम यांनी निवेदनाद्वारे या. तहसिलदार साहेब यांच्याकडे कडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात दिवसाला1000ते 1500 रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे. अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आशा रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन दुकानदार अन्न व औषध प्रशासन* या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. यावर *अन्न व औषध प्रशासन विभागाचे* कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही.हे इंजेक्शन वेळेवर मिळाले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व अनेक रुग्ण गंभीर असून या रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना सहजरीत्या व माफक दरात उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्रशासनामार्फत करावी अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पंडीत पाटील जाधव, राष्ट्रवादी यु. चे माजी तालुकाध्यक्ष हानमंत पा जगदंबे पिंपळगावकर, मा नगरसेवक रवींद्र शेट्टी, विद्यार्थी शहराध्यक्ष किरण गजभारे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाबुराव गोणारकर, गटनेता भोजराज गोणारकर, नगरसेवक प्रतिनिधी सुधाकर जाधव, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष मोहसिन खान आणि महिला शहराध्यक्ष सय्यद सुलताना बेगम,आदी उपस्थित होते.

COMMENTS