*1 हजार 337 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी* ▪️नांदेड जिल्ह्यात 1 हजार 210 व्यक्ती कोरोना बाधित

▪️28 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू ▪️कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आ...

▪️28 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

▪️कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4  हजार 509 अहवालापैकी  1 हजार 210 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 895 तर अँटिजेन तपासणीद्वारे 315 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 74 हजार 100 एवढी झाली असून यातील 57  हजार  273 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार  852 रुग्ण उपचार घेत असून 248 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक 21 ते 23 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 28 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 377 एवढी झाली आहे.   दिनांक 21 एप्रिल रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे नायगाव येथील 91 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे शनिवार पेठ किनवट येथील 60 वर्षाचा महिला, मंगाबोडी ता. किनवट येथे 58 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड येथील 45 वर्षाची महिला, नारायणा कोविड रुग्णालय येथे सिडको येथील 70 वर्षाचा पुरुष, दिनांक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे पळसगांव ता. नायगाव येथील 59 वर्षाचा पुरुष, किनवट येथील 58 वर्षाचा पुरुष, चांदोळा ता. मुखेड येथील 69 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर नांदेड येथील 78 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 60 वर्षाची महिला, मुखेड येथील 27 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे जानकी नगर नांदेड येथील 84 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 60 वर्षाचा पुरुष, देगलूर नाका येथील 38 वर्षाचा पुरुष, बामणी ता. बिलोली येथील 50 वर्षाची महिला, तरोडा नाका नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, सैलानी नगर नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे पावडेवाडी नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे कळसकर गल्ली येथील 69 वर्षाचा पुरुष, राजूरा ता. देगलूर येथील 58 वर्षाचा पुरुष, सद् गुरुनगर देगलूर येथील 76 वर्षाचा पुरुष, संजीवनी कोविड रुग्णालय येथे फरांदे नगर येथील 65 वर्षाचा पुरुष, तिरुमला कोविड रुग्णालय येथे व्यंकटेश नगर नांदेड येथील 59 वर्षाचा पुरुष, लोट्स कोविड रुग्णालय येथे जांभळसावली ता. हदगाव येथील 57 वर्षाचा पुरुष, दिनांक 23 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हस्सापूर नांदेड येथील 80 वर्षाची महिला, हनुमानगड नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.09 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 496, नांदेड ग्रामीण 25, अर्धापूर 45, भोकर 20, बिलोली 3, देगलूर 48, धर्माबाद 35, हिमायतनगर 5, कंधार 56, किनवट 2, लोहा 42, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 24, उमरी 2, हदगाव 68, हिंगोली 5, लातूर 1, अकोला 1, यवतमाळ 1, परभणी 3, निजामाबाद 1 असे एकूण 895 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 45, नांदेड ग्रामीण 13, अर्धापूर 3, भोकर 6, बिलोली 2, देगलूर 7, धर्माबाद 5, हदगाव 19, हिमायतनगर 2, कंधार 11, किनवट 52, लोहा 18, माहूर 29, मुदखेड 17, मुखेड 26, नायगाव 31, उमरी 19, नागपूर 2, मुंबई 2, अमरावती 1, यवतमाळ 1, हिंगोली 2, परभणी  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 315 बाधित आढळले.

आज 1 हजार 337 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 208, एनआरआय कोविड केअर सेंटर 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 203, नायगाव कोविड केअर सेंटर 38, उमरी कोविड केअर सेंटर 69, माहूर कोविड केअर सेंटर 46, बारड कोविड केअर सेंटर 16, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 65, शासकीय आयर्वेदिक महाविद्यालय 137, भोकर कोविड केअर सेंटर 13, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 310, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 149, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 56, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5 हजार 958, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 118, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 111, नांदेड जिल्ह्यात तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 586, देगलूर कोविड रुग्णालय 54, कंधार कोविड केअर सेंटर 25, खाजगी रुग्णालय 2 हजार 37, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 57, धर्माबाद कोविड केअर सेंटर 121, हैद्राबाद येथे संदर्भित 1, बिलोली कोविड केअर सेंटर 80, मुदखेड कोविड केअर सेंटर 166, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 20 असे एकूण 13 हजार 852 उपचार घेत आहेत. 

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 337 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 29,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 13, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 699, मुखेड कोविड रुग्णालय 80, हदगाव कोविड रुग्णालय 10, धमार्बाद तालुक्यातंर्गत 7, बिलोली तालुक्यातंर्गत 56, कंधार तालुक्यातंर्गत 7, देगलूर कोविड रुग्णालय 7, किनवट कोविड रुग्णालय 19, नायगाव तालुक्यातंर्गत 14, अर्धापूर तालुक्यातंर्गत 29, हिमायनगर तालुक्यातंर्गत 35, लोहा तालुक्यातंर्गत 27, उमरी तालुक्यातंर्गत 34, बारड कोविड रुग्णालय 98, मांडवी कोविड केअर सेंटर 6, माहूर तालुक्यातंर्गत 22, खाजगी रुग्णालय 125 बरे झालेल्या बाधितांचा समावेश आहे.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 8 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 35 हजार 511

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 52 हजार 789

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 74 हजार 100

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 58 हजार 610

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 377

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.09 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-34

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-72

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-391

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 13 हजार 852

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-248

00000

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group