माजलगाव/भास्कर गिरी
तहसीलदार यांना काल दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की
पदवीधर अंशकालीन कर्मचारी ता.माजलगाव जि.बीड येथील रहीवाशी असून शासन दरबारी आमचा उदरनिर्वाह भागावा म्हणुन मागच्या २० वर्षापासुन लढा देत आहोत मात्र शासनाने पाहिजे तेवढे दखल न घेतल्याने आमच्या रोजी रोटीचा प्रश्न आजही गंभीर बनला आहे.आमच्या संघटनेच्या संघर्ष व पाठपुराव्यामुळे मा.मंत्री कौशल्य विकास नवाब मलीक साहेब यांनी सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावुन व चर्चा करुन दि.२२ फेब्रुवारी २०२१ ला पत्र काढुन पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना तात्काळ त्या त्या ठिकाणी त्यांच्या पात्रतेनुसार व जेष्ठतेनुसार नियुक्ती देण्याचे आदेश संबंधीतांना निर्गमीत केले आहेत.
तशि प्रक्रीया देखील सुरु झाली आहे या संदर्भात तहसीलदार वैजापूर जी औरंगाबाद दि २ मार्च २०२१ व तहसीलदार गंगापूर जी औरंगाबाद दि ११ फेब्रुवारी २०२१ रोजी यांनी कौशल्ये विकास अधिकारी औरंगाबाद यांना दिलेल्या पदवीधर अंशकलीन कर्मचारी मागणी पत्राप्रमाणे आपल्या तालुक्यातही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात आपणही तालुक्यातील रिक्त जागांचा आढावा घेवुन मा.साहय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्र बीड यांच्याकडे करुन शासनाच्या दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ च्या पत्राची प्रभावी अंमलबजावणी करुन आम्हा पदविधर अंशकालीन कर्मचारी माजलगाव यांना न्याय मिळवुन द्यावा या मागणीचे निवेदन काल दि ४रोजी तहसीलदार यांना देण्यात आले
या वेळी विष्णू उगले ,संजय गाढे ,सतीश सरवदे ,रमेश रबुद , गौतम डोंगरे व पांडुरंग उगले आदी पदवीधर अंशकलीन कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS