*केज पंचायत समितीच्या दांडीबहाद्दर कर्मचार्यांची गय केली जाणार नाही - सिईओ अजित कुंभार*
*गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडेंवर नामुष्कीची वेळ*
*अनंत जाधव /मस्साजोग*
*केज पंचायत समितीत ५६ कर्मचारी कार्यरत असून यातील ९० % कर्मचारी दांडीबहाद्दर असल्याचे समोर आल्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केज पंचायत समितीला अचानकपणे भेट दिली यावेळी सिईओ अजित कुंभार यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला आसून गटविकास अधिकार्यांना अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.त्यामुळे केजचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडेंवर नामुष्कीची वेळ आल्याचे पुन्हा एकदा पहावयास मिळाले आहे.
केज पंचायत समिती रोहयो भ्रष्टाचार प्रकरणी सिईओंच्या रडारवर असतानाच दांडीबहाद्दर कर्मचार्यांमुळे पुन्हा मागील काही दिवसांपासून चर्चेत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बीड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ४ च्या दरम्यान केज पंचायत समितीला अचानकपणे भेट देत सर्वच विभागात फेरफटका मारला आसून विविध विभागांचा दोन तास बसून सविस्तरपणे आढावा घेतला आहे.तसेच स्वच्छतेच्या विषयी देखील गटविकास अधिकार्यांना सूचना केल्या आसून तात्काळ अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे
*पत्रकारांच्या प्रश्णालाही सिईओ अजित कुंभारांचे सडेतोड उत्तर*
*प्र.१) ५६ कर्मचारी असलेल्या केज पंचायत समितीत १० ते १२ कर्मचारीच उपस्थित असतात तर उर्वरित कर्मचारी गायब असतात परंतू गटविकास अधिकारी कसलीच कारवाई करताना दिसत नाहीत.*
*उत्तर :- तसा अहवाल गटविकास अधिकार्यांना मागीतला आसून अहवाल आल्यास कारवाईचे आदेश देण्यात येतील*
*प्र.२) केज तालुक्यातील रोहयो भ्रष्टाचाराच्या चौकशीत वशिलेबाजी होणार की निपक्षपाती होणार..*
*उत्तर :- केज पंचायत समितीच्या चौकशी निष्पक्षपातीपणे झालेली आहे संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही.*

COMMENTS