नांदेड:- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 27 ते 30 ऑगस्ट 2026 svict स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेरवण जि रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या 14 वर्ष आतील,16वर्ष आतील व 18 वर्षा आतील ,20 वर्ष आतील , आतील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय ज्युनियर स्पर्धेसाठी नांदेड ज़िल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ क्रीडा मैदान विष्णुपुरी नांदेड येथे दि. 09 ऑगस्ट रविवार 2026 रोजी सकाळी 7:00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये 14 वर्षा आतील मुले व मुलींची स्पर्धा - 60 मी ,600मी,लांब उडी, गोळा फेक (A B ,C ग्रुप आहेत) व 16 वर्षा आतील मुले व मुलींची स्पर्धा 60 मी, 600मी,लांब उडी,4kg गोळा फेक,भाला फेक 600ग्राम, हर्डल्स 80 मीटर, 18 वर्षाआतील मुले व मुलींची स्पर्धा - 100मी , 200मी,400 मी,1000 मी धावणे ,उंच उडी,लांब उडी,गोळा फेक 5 किलो, थाळी फेक1.5किलो,भाला फेक 700 ग्राम,5 किमी चालणे, 20 वर्ष/23 वर्ष आतील मुले मुली 100 मी,200 मी,400 मी, 800 मी,1500 मी, 5000 मी,10000 मी, गोळा फेक, भालाफेक,4×400मी,4×100 मी रिले, हातोडा फेक, उंच उडी ,110/400मी हर्डल्स या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड नांदेड जिल्हा संघात केली जाणार आहे. किमान पात्रता कामगिरी करणाऱ्या खेळाडूस निवडण्यात येईल. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड , जन्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत),पासपोर्ट साइज फोटो1, जिल्हा नोंदणी फी, इव्हेंट फी, दहावीची सनद, वय व रहिवाशी प्रमाणपत्र, सत्यप्रत सोबत आणावे. बाहेर जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊ नये तसेच बारा वर्षे आतील खेळाडूंसाठी ही स्पर्धा नाही याची नोंद घ्यावी*याच ठिकाणी 14 व 16 वर्षे आतील वयोगटातील मुला मुलींसाठी अंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धा (NIDJAM 2026/27) संपन्न होणाऱ्या स्पर्धेसाठी देखील निवड होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
या स्पर्धा ठिकाणी नोंदणी करावी
14 वर्ष आतील मुले मुली - 28 /10/2012 ते 27/10/2014 दरम्यान जन्मलेले
16 वर्ष आतील मुले मुली- 28/10/2010 ते 27/10/2012 दरम्यान जन्मलेले
18 वर्षआतील मुले मुली -28/10/2008 ते 27/10/2010 दरम्यान जन्मलेले
20 वर्ष आतील मुले मुली-
28/10/2006 ते 27/10/2008 दरम्यान जन्मलेले
व जन्मदिनांक असणारे खेळाडू फक्त त्यांच्या संबंधित वयोगटातच भाग घेऊ शकतात. स्पर्धेपूर्वी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया(AFI) याची यूआयडी काढणे अनिवार्य आहे.नोट 23 वर्ष आतील मुले मुली यांच्या फक्त जिल्हास्तरीय स्पर्धा होतील राज्य स्पर्धा फक्त या गटाच्या होणार नाहीत याची खेळाडूंनी नोंद घ्यावी.
यासाठी विष्णू पूर्णे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून डॉ महेश जाधव , रुपाली कुलकर्णी, साईनाथ दंतुलवाड, नारायण सूर्यवंशी , शिवकांता देशमुख, कांचन मस्के,वैभव अंभोरे, मोहम्मद अन्वर, सविता पतंगे, शिवा जाधव,संतोष आणेराव ,लक्ष्मण फुलारी, बालाजी भवांनकर,वैभव अंभोरे,शरद कपाटे,अमृत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.स्पर्धा प्रमुख म्हणून वैभव दोमकोडवार, ज्ञानेश्वर सोनसळे याची निवड करण्यात आली आहे. या अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर व सचिव प्रलोभ कुलकर्णी आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. अधिक माहिती साठी
विष्णु पूर्णे सर 7588430145,
वैभव दोमकोंडवार 9689939373 ,
ज्ञानेश्वर सोनसळे 9970356228,
नांदेड,
गोविंद पांचाळ
9146819813,
शब्बीर शेख 8805023440 धर्माबाद,
बालाजी गाडेकर भोकर
9921855097,
ज्ञानेश्वर कोंडलांडे 9970356228 बिलोली,
संतोष वाकोडे सर 7588430065 हदगाव,
कृष्णा तलवारे सर 9657707295 देगलूर
शुद्धोधन नरवाडे 8007704359. यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS