◼️ पाटीच्या मणक्यावरील उपचार फसला
◼️ घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या देशमुखांचा लगाम सुटला
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रोजगार हमी विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सतीश देशमुख यांनी पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्याने कार्यालय परिसरात गोडा बांधण्याची परवानगी देण्यात यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते परंतु या पत्रानंतर काही तास चाललेल्या प्रयत्नानंतर देशमुखांच्या या उपचाराला अखेर जालीम उपाय मिळाला असून त्यांच्या घोड्याला बुधवारी रात्री उशिरा लगाम लागला आहे वेगवेगळ्या व्याधी वर अनेक वेळा उपचार करूनही त्यावर फारसा फरक पडत नसल्याने अनेकांना अनुभव आहे सदरील विषय संपूर्ण राज्यात चवीने चर्चिला गेला होता दरम्यान सतीश देशमुख यांच्या या अफलातून मागणीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विचारमंथन करण्यात आले त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी मागणीच्या अनुषंगाने डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात आला दरम्यान त्यांच्या या पत्रानंतर अस्थी रोग उपचार शास्त्र प्रमुख यांनी सतीश देशमुख यांनी दिलेल्या पत्रावर शास्त्रोक्त पद्धतीने अभिप्राय दिला आणि त्यात त्याने असे नमूद केले की पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखी मनक्यावर जोर पडतो त्यामुळे मणक्यातील गादी ती सरकण्याची शक्यता असते त्यामुळे पाठीचा आजार कमी न होता ती वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळवले आहे या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची व परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या सतीश देशमुख यांनी सपशेल माघार घेतली असून त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या एका पत्राद्वारे आपण केलेल्या मागणीतून माघार घेत असल्याचे नव्याने पत्र दिले आहे


COMMENTS