कोरेगाव येथील अंगणवाडी मदतनीस उर्मिला पायाळ* *यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरी मध्ये उडी मारून वाचवला एका चौदा वर्षिय मुलाचा जिव*


 *सावित्रीची लेक तुझ्या धाडसाला सलाम म्हणत अंगणवाडी मदतनीस उर्मिला पायाळ यांचे विविध स्तरांतून कौतुक*

*अनंत जाधव /मस्साजोग -*

*केज तालुक्यातील कोरेगाव येथील अंगणवाडी मदतनीस उर्मिला प्रल्हाद पायाळ*

*यांनी स्वतःचा जिवधोक्यात घालून वाचवला एका मुलाचा जिव वाचवला आहे*


अधिक माहिती अशी की कोरेगाव येथील एक चौदा वर्षांचा मुलगा दिनांक 3 मार्च बुधवार रोजी घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडिलांना मदत करून पैसे मिळवून देण्यासाठी आई वडिलांन बरोबर शेतात कामाला गेलेला इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला मुलगा 

 वैभव बळीराम लांब त्याचा भाऊ हे दोघे जण पिण्याचे पाणी संपले होते म्हणून पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहीरीवर गेले असता वैभव हा विहिरी मध्ये पाणी काढण्यासाठी उतरला असता त्याचा पाय घसरला व विहिरीत पडला व त्याला पोहता येत नसल्यामुळे तो मोठ्याने ओरडत ओरडत वाचवा वाचवा म्हणू लागला पण सोबत असलेल्या भावाला पण पोहता येत नसल्यामुळे तो पण मोठ्याने ओरडला असता त्याचा ओरडण्याचा आवाज शेजारच्या शेतात रोजंदारी वर काम करत असलेल्या उर्मिला प्रल्हाद पायाळ या अंगणवाडी मदतनीस ला आवाज ऐकू गेला असता त्या मदतनीस इकडे तिकडे न पाहता विहीरीकडे धाव घेतली असता तीला तो मुलगा बुडत असताना दिसला व त्या अंगणवाडी मदतनीस ने स्वातःच्या जिवाची पर्वा न करता तिने विहिरीत ऊडी मारली व वैभवचा जिव वाचवला असता उर्मिला प्रल्हाद पायाळ या अंगणवाडी मदतनीस यांचा विविध स्तरांतून व बालविकास प्रकल्प अधिकारी 

श्रीमती लटपटे मॅडम व

मस्साजोग विभागाच्या पर्यवेक्षीका श्रीमती गिते मॅडम 

यांनी तिचे कौतुक केले आहे व 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला बालविकास कार्यालय केज यांच्याकडून अंगणवाडी मदतनीस 

 ऊर्मिला पायाळ यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आला आहे

टिप्पण्या