*गटविकास अधिकार्यांच्या मनमानीला नागरीक वैतागले..*
*अनंत जाधव /मस्साजोग*
*केज पंचायत समितीला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिल्यानंतर गटविकारी दत्तात्रय दराडे यांना कर्मचार्यांना सुधारताना नाकीनऊ आल्याचे दिसत आहे.दरम्यान गटविकास अधिकार्यांची भूमिका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशीच असल्याचे दिसत आहे.*
केज पंचायत समिती रोहयो भ्रष्टाचार प्रकरणात सिईओ अजित कुंभार यांच्या रडारवर आहे.त्यातच गटविकास अधिकार्यांच्या आशीर्वादाने दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे पंचायत समिती पुन्हा साईओ अजित कुंभार यांच्या रडारवर आली असून या प्रकरणी सिईओ अजित कुंभार यांनी पंचायत समितीला भेट देऊन विविध कामाचा आढावा घेऊन गटविकास अधिकार्यांना तात्काळ अहवाल देण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.
परंतू गटविकास अधिकार्यांनी पुन्हा "पुढे पाठ मागे सपाट''असेच धोरण सुरू केल्याने सिईओंच्या भेटीचा गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडेंवर कसलाच परिणाम झाला नाही..? असाच प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान गटविकास अधिकार्यांकडून पंचायत समितीतील दांडीबहाद्दर कर्मचार्यांची पाठराखण कशामुळे केली जाते..? सार्वजनीक जलसिंचन विहिरींचे मस्टर बंद करून नागरीकांना कशासाठी वेठीस धरले जातेय..? घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते देण्यास येवढी दिरंगाई कशासाठी होतेय..? रोहयोच्या नोटिस बजावन्यास एवढा विलंब कशामुळे झाला होता..? प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ कशामुळे केली जातेय..? व गटविकास अधिकारी नेमके काय लपवत आहेत.असे एकना अनेक प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केले जात आहेत.त्यामुळे गटविकास अधिकार्यांची भुमिका म्हणजे नाचता येईना आंगण वाकडे असेच सध्यातरी म्हणता येईल.

COMMENTS