भाविकांना दर्शनासाठी गर्दी करु नये - श्रीक्षेत्र खंडोबा मोगरलींग देवस्थानचे अध्यक्ष- शिवराज महाराज भरडे
माजलगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील मोगरा येथील श्रीक्षेत्र खंडोबा मोगरलींग देवस्थानच्या वतिने दरवर्षी मोठ्या उत्साहात आखंड हारिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते,याहीवर्षी आखंड हारिनाम सप्ताहाचे आयोजन करण्या आले होते मात्र पोलीस व प्रशासनाच्या सुचनेवरुन आखंड हारिनाम सप्ताहात होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आखंड हारिनाम सप्ताह रद्द करण्यात आला असुन या सप्ताहासाठी व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करु नये असे आवाहन श्री क्षेत्र खंडोबा मोगरलींग देवस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज भरडे यांनी केले आहे.
माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील जार्गत असलेले खंडोबा देवस्थान असुन पंचक्रोशीतील देवस्थान असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र खंडोबा मोगरलींग देवस्थानच्या वतिने मोठ्या उत्साहात आखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते,याहीवर्षी आखंड हारिनाम सप्ताहाचे आयोजन श्रीक्षेत्र खंडोबा मोगरलींग देवस्थानच्या वतिने दि २१ मार्च पासुन प्रारंभ होणार होते तर सप्ताहाची समाप्ती हि दि २८ मार्च रोजी काल्याच्या किर्तनाने होणार होती,या आखंड हरिनाम सप्ताहासाठी मोगरा,डाके पिंपरी, आनंदगाव,शुक्लतिर्थ लिमगाव,सोन्नाथडी,खरात आडगाव,उमरी,निपाणी टाकळीसह माजलगाव
शहरातुन हाजारो भाविक आखंड हारिनाम सप्ताहातील कथा व किर्तन ऐकण्यासाठी व दर्शनासाठी येत आसतात,या आखंड हारिनाम सप्ताहात सात दिवस चालत असलेल्या कथा,किर्तन व दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने आखंड हारिनाम सप्ताहातील होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक प्रशासन व पोलीस प्रशासानाच्या सुचनेवरुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा आखंड हरिनाम सप्ताहा रद्द करण्यात आला असुन याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी व दि २१ मार्च पासुन आखंड हारिनाम सप्ताह रद्द करण्यात आल्याने भाविकांना दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन मोगरा येथील श्रीक्षेत्र खंडोबा मोगरलींग देवस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज भरडे यांनी भाविकांना केले आहे.

COMMENTS