माजलगाव/प्रतिनिधी
तहसील कार्यालयात जनमाहिती अधिकारी यांना दिनांक 12 जानेवारी रोजी प्रपत्र (क) नुसार सिधु राठोड यांनी माहिती मागितली होती, ती माहिती देण्यास तहसील कार्यालय जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.
जन माहिती अधिकारी खानापूर सजाचे तलाठी नाकाडे यांना माहिती देण्यास आदेशीत केले होते परंतु खानापूर सजाचे तलाठी नाकाडे यांना आदेशीत केले असताना ही मला माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. म्हणून प्रथम अपिल 19 (1) नुसार तहसीलदार यांना 12 जानेवारी 2021 रोजी करण्यात करण्यात आले आहे. त्याची सुनावणी दिनांक, 03 मार्च 2021 रोजी असल्याचे कळविले असता त्यानुसार तहसिल कार्यालयात उपस्थित राहिलो असता मला कोणत्याही प्रकारचे सुनावणी असल्याचे आढळून आले नाही.राठोड यांनी याची माहिती घेतली असता महसूल चे कर्मचारी एकमेकांवर ढकलत करतांना दिसले आहेत. माहिती अधिकार -2005 या कायद्याचा धाक माजलगाव तहसील कार्यालयात राहिला नाही असे राठोड यांनी बोलताना सांगितले आहे.

COMMENTS