धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा विभागाकडून विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ श्रीराम गव्हाणे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ नारायण शिवशेट्टे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सौ वडवळकर मॅडम,प्रा श्रीगिरे सर, प्रा जिडगे सर, प्रा वाडियार सर, प्रा मनुरकर सर, प्रा कोरेबोईनवाड सर, सौ बंडले मँडम,सौ तोटावार मँडम, प्रा बोधनकर सर, प्रा शिंदे सर, प्रा शिवशेट्टे सर, क्रीडा विभागाचे प्रा जाधव सर इ प्राध्यापक उपस्थित होते.
महाविद्यालयात मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतील असे प्रभारी प्राचार्य डॉ गव्हाणे यांनी सांगितले तर मराठी भाषेत विविध क्षेत्रात संधी कशी आहे त्याचे विवेचन प्रमुख पाहुणे नारायण शिवशेट्टे यांनी केले.
पाहुण्यांच्या मनोगत झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे कवी संमेलन झाले त्यात महाविद्यालयाचे संतोष साखरे, साईनाथ मुदगलवाड, कुलदीप मस्के,युवराज मनाली, कु आकांक्षा आडपोड, वैष्णवी आरगुलवार, वैष्णवी आगलावे यांनी विविध विषयावर आपल्या कविता सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचा विद्यार्थी संतोष साखरे तर आभार प्रदर्शन प्रा जिडगे यांनी केले

COMMENTS