महेंद्र पुरी, हिंगोली
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 1 मार्च ते 7 मार्च जिल्ह्यात कडक लाँकडाऊन लागु करण्यात आले आहे. लाँकडाऊन काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले आहे. कोरोना महामारी चे रूग्ण जिल्ह्यात वाढतच चालले असुन कोविडचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोविड च्या अनुषंगाने शासनाने लाऊन दिलेल्या नियमांचे सर्व नागरीकांनी पालन करावे. ज्यामध्ये सोशल डिस्टसिंग, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, मास्क चा उपयोग करावा तसेच लाँकडाऊन च्या नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. पोलिस हे तुमच्या साठीच रस्त्यावर बंदोबस्तासाठी आहेत, पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले आहे.सोमवारी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी शहर व ग्रामीण हद्दीत फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला यावेळी नांदेड नाका परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना काही सुचनाही दिल्या.. शहरात मोटरसायकलवर फिरणाऱ्या नांगरीकांची चौकशी करावी, मास्क न वापरणारे, विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच बंदोबस्तावर बेशिस्त पणे बिनधास्त असलेल्या पोलिस कर्मचारी यांना पोलिस अधिक्षक यांनी चांगलेच खडसावले.

COMMENTS