सेलू ( )नूतन विद्यालयात 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' दि. 1 मार्च रोजी ,नूतन विद्यालयात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर होते. प्रमुख पाहुणे डॉ संजय हरबडे वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय सेलू उपस्थित होते.व्यासपीठावर मुख्याध्यापक अशोककुमार वानरे, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले,पर्यवेक्षक नारायण सोळंके,डॉ काशिनाथ पल्लेवाड, उपस्थित होते.
डॉ हरबडे म्हणाले,कोविड 19 च्या काळात विद्यार्थ्यांनी जागृत राहुन आपला परीसर ,कुटुंबाची घ्यावी, विज्ञानाचे महत्व सांगून, कोरोनापासून बचावाचे उपाय सांगितले.व अध्यक्षिय समोरोप प्रंसगी डॉ .विनायकराव कोठेकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी आपली निरीक्षण शक्ती वाढवा.असे सांगितले.या प्रसंगी विज्ञान शिक्षक कुशल कडे,सौ. उज्वला लड्डा यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रम चे प्रास्ताविक पर्यवेक्षक नारायण सोळंके यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनुजा सुभेदार यांनी केले.तर तर आभार सौ अश्विनी केंद्रे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनीता दहिफळे, शुभांगी आष्टीकर,सुर्यकला सूर्यवंशी, वर्षा कदम यांनी पुढाकार घेतला .

COMMENTS