कनेक्शन कट कराल तर हक्कभंग दाखल करु शेतकरी संघटनेचा महावितरणला ईशारा

सोनपेठ दि.३( प्रतिनिधी) विधानसभेत अजितदादांनी घोषणा करुन ही विज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करणार असतील तर त्यांच्या वि...


सोनपेठ दि.३( प्रतिनिधी) विधानसभेत अजितदादांनी घोषणा करुन ही विज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करणार असतील तर त्यांच्या विरुध्द सभागृह व उपमुख्यमंत्र्याचा हक्क भंग केल्याची तक्रार शेतकरी संघटना विधानसभेत करेल असा ईशारा शेतकरी संघटनेच्या वतीने विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि. २ रोजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ नुसार स्थगन प्रस्तावाद्वारे वीज वितरण कंपनीच्या सक्तीच्या विज बिल वसुली विरुध्द प्रस्ताव मांडला यावर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ शेतीपंप व घरगुती विजबिल वसुली थांबवुन कोणाचीही विज तोडली जाणार नाही असे अश्वासन सभागृहाच्या माध्यमातून दिले . मंत्र्यांनी सभागृहात केलेली घोषणा ही संबधित विभागासाठी आदेशच असतो असे असतांना विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे विजबिल वसुलीसाठी शेतकरी व घरगुती ग्राहकांची वीज तोडत आहे. हा मा. उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते व सभागृहाचा अपमान आहे. यापुढे विज वितरण कंपनीने सभागृहात या विषयावर चर्चा होऊन विजबिल माफीचा निर्णय होत नाही तो पर्यंत कोणत्याही ग्राहकाची वीज तोडु नये अन्यथा वीज तोडणी साठी आलेल्या महा वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुध्द विधानभवनात उपमुख्यमंत्री,विरोधीपक्ष नेते व संपुर्ण सभागृह यांचा अवमान केला म्हणुन हक्कभंग प्रस्ताव तसेच इतर योग्य त्या कारवाई साठी तक्रार करुन आंदोलन केले जाईल असा ईशारा शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कंपनीस एका निवेदना द्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर गणेश पाटील,सुधीर बिंदू,विश्वंभर गोरवे,माऊली जोगदंड,माधव जाधव आण्णा जोगदंड, सोमनाथ नागुरे,गणेश पतंगे,अनिल भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.या निवेदनाच्या प्रतीलीपी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आमदार सदाभाऊ खोत यांना देण्यात आल्या आहेत.


फोटो :- महावितरणला निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel