मुंबई - 3 मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात व स्पर्धकांच्या प्रचंड प्रतिसादात साजरे झाले. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सरकारी निर्बंधांमुळे कार्यक्रम व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या सोहळ्यास प्रसिद्घ अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पवार,ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे,प्रसिद्घ अभिनेते पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे,ज्येष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव, रांगोळीकार सिद्धेश बागवे आणि गजल नवाज पंडित भिमराव पांचाळे यांचे परिक्षण व मार्गदर्शन लाभले.
या दोन्ही कार्यक्रमांचा सांगता सोहळा पोर्ट ट्रस्टच्या बॅलार्ड पिअर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये 2 मार्च 2021 रोजी सुप्रसिद्ध हिन्दी- मराठी नाट्य,मालिका व चित्रपट अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व विजेत्यांना रोहिणी ताईंच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या श्रम विभागाचे वरिष्ठ उपव्यस्थापक मिलिंद कुलकर्णी, उप व्यवस्थापक रुफी कुरेशी, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर उपस्थित होते. तसेंच मुख्य लेखाधिकारी श्रीमती मुळ्ये, डेप्युटी सचिव श्रीमती पटवर्धन, वरिष्ठ उप व्यवस्थापक बावडेकर, वरिष्ठ श्रम अधिकारी रामगुडे आवर्जून उपस्थित होते.विश्वस्त श्री. सुधाकर अपराज यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने विजय सोमा सावंत यांनी उत्तम केले होते. त्यांना प्रमोद दळवी,प्रवीण शिंदे,कल्पना कुलकर्णी यांची चांगली साथ लाभली. या कार्यक्रमाने आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांची यशस्वी सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजीव जलोटा, उपाध्यक्ष श्री. उन्मेश वाघ तसेच सचिव श्री. जी. एस. राठोड यांनी सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहाय्य केले, त्या सर्वांचे रुफी कुरेशी यांनी आभार मानून, असेच उत्तमोत्तम कार्यक्रम भविष्यात ही आयोजित करून यशस्वी करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
मारुती विश्वासराव

COMMENTS