सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
ऊसतोडीसाठी आलेल्या महिलेस तीच्या सासूने व नवऱ्याने त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून सोनपेठमध्ये सासू व नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,सद्या ऊसतोडणी हंगाम चालू असल्याने बाहेर जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी मंजूर सोनपेठ तालुक्यात दाखल झालेले आहेत.यात आंबाजोगाई तालुक्यातील एक जोडपे ऊसतोडणीसाठी धामोनी शिवारात आलेले आहे.एकोणीसवर्षीय विवाहीत महिला सोनाली ज्ञानेश्वर आडे हीला तीचा नवरा ज्ञानेश्वर रोहिदास आडे व सासू राजुबाई रोहिदास आडे या दोघांकडून नेहमी त्रास होत असल्याने या त्रासाला कंटाळून तीने आपले जीवनयात्रा विहिरीत उडी मारुन संपवली आहे.
*आत्महत्येचा रचला होता आरोपीने बनाव*
दरम्यान या घटनेने भेदरलेल्या आरोपी नवऱ्याने बायकोने आत्महत्या केली असा बनाव रचल्याने पोलिसांनी खाकी दाखताच आरोपीने तीला आम्ही त्रास देत होतो.तीने आत्महत्या केल्यानंतर घागर पाण्यात टाकल्याचे आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगीतल्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून दोघांविरुद्ध सोनपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने,जमादार आडे करत आहेत.

COMMENTS