धर्माबाद (अहमद लड्डा) नगरपरीषद क्षेत्रातील बाळापुर येथील तलाठी सहदेव बासरे, रत्नाळी येथील तलाठी शेख मुर्तुजा व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी संगनमत करून मालमत्ता धारकांची आडवणूक करून आर्थिक तडजोडीनंतर नियमबाह्य पद्धतीने विविध कामे करून आपले चांगलेभले करुन घेत आहेत.परंतु सदरील प्ररकरणाकडे वरीष्ठ अधिकारी दुर्लश करीत आहेत की त्यांची त्यांना मुक संमती आहे.अशी चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी येथील तहसिलदार दत्तात्रय शिंदे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नामदेव माळोदे हे पूर्वी धर्माबाद येथे तलाठी म्हणून कार्यरत होते.परंतु आता गेल्या अनेक महिन्यांपासून येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माळोदे हे बाळापुर येथील तलाठी असताना अनेक नियमबाह्य पद्धतीने काम करीत असल्यामुळे त्यांना काही जणांनी चांगलाच चोप दिला होता.परंतु शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या मधस्थी सदरील प्ररकरण मिटविण्यात आले होते.नामदेव माळोदे हे खास करून धर्माबाद येथे बदली करुन आले असल्याची चर्चा होत आहे.त्यांनी येथील मंडळ अधिकारी पदाचे पदभार घेतल्यापासून मनमानी कारभार करीत आहेत.तात्कालीयन तहसिलदार श्रीमती ज्योती चव्हाण यांनी काढलेल्या एका आदेशाची पायमल्ली करून मालमत्तेचे नोंद सातबाराऱ्यावर घेण्याची काही गरज नसल्याचे सांगून शेकडो आलेले प्रस्ताव रद्द करून अकलेचे तारे तोडले आहेत.परंतु सदरील प्ररकरणात माळोदे यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. परंतु आता जिल्हाधिकारी यांनी एन.ए.ले -आऊट व सर्वे नंबर असलेल्या मालमत्तेची नोंद सातबाराऱ्यावर घेण्याची गरज असून सातबाराऱ्यावर मालमत्तेची नोंद असल्याशिवाय सदरील मालमत्तेचे दस्तनोंदणी करण्यात येऊ नये,असा एक नवा आदेश दि ४ जानेवारी २०२१ रोजी काढला आहे.त्यामुळे पूर्वी नगरपरीषदेच्या मालकी हक्क प्रमाणपत्र, गावठाण प्रमाणपत्र व दाटवस्तीचे प्रमाणपत्र जोडून दस्तनोंदणी होत होत्या.परंतु जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशामुळे वरील सर्व दस्तनोंदणी बंद करण्यात आले आहेत.त्यामुळे आता मालमत्तेचे नोंद सातबाराऱ्यावर करणे बंधनकारक झाले असल्यामुळे सदरील संधीचा फायदा येथील तलाठी सहदेव बासरे,तलाठी शेख मुर्तुजा व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी घेऊन नियमबाह्य पद्धतीने मालमत्तेचे नोंद सातबाराऱ्यावर करून आपले चांगलेभले करुन घेत आहेत.एखाद्या मालमत्तेस सर्वे नंबर नाही.व सदरील दस्तनोंदणी मध्ये सर्वे नंबर नसल्याचा उल्लेख आहे.तरीही सदरील अनेक मालमत्तेच्या नोंदी तलाठी व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी संगनमत करून सातबाराऱ्यावर घेतल्या आहेत.मात्र नियमानुसार मालमत्तेचे नोंद सातबाराऱ्यावर करणे गरजेचे असताना,सुध्दा येथील तलाठी साधी नोटीस काढण्यासाठी आठ ते दहा महिन्यांपासून मालमत्ता धारकांना आडवणूक करीत आहेत.नंतर आर्थिक तडजोड झाल्यानंतरच सदरील मालमत्तेचे नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करीत असल्याच्या आजपर्यंत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.परंतु वरीष्ठ अधिकाऱ्याकडून तलाठी व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांना अभय मिळत असल्यामुळे त्यांची मनोपल्ली झाली असल्यामुळे मालमत्ता धारकांत संतापाची लाट उसळली आहे.सदरील प्ररकरणाची दखल छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी घेतले असून तलाठी सहदेव बासरे व तलाठी शेख मुर्तुजा व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी येथील तहसिलदार दत्तात्रय शिंदे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे केली आहे.सदरील प्ररकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन तहसिलदार दत्तात्रय शिंदे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशापासून पूर्वी मालकी प्रमाणपत्रावर होत असलेल्या आता दस्तनोंदणी बंद झाल्या आहेत.परंतु नगरपरीषद क्षेत्रातील रत्नाळी,बाळापुर व धर्माबाद येथे गेल्या ७० ते ८० वर्षांपासून असलेल्या मालमत्तेला आता सर्वे नंबर नाही. व सातबाराऱ्यावर सर्वे नंबरची नोंद घेणे शक्य नाही.त्यामुळे सदरील मालमत्तेचे खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला आहे.त्यामुळे सदरील मालमत्ता धारकांच्या मुला,मुलीचे विवाह,शिक्षण व आरोग्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी अनेकांनी आपल्या मालमत्तेची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत.परंतु सदरील मालमत्तेची दस्तनोंदणी होत नसल्यामुळे नाईलाजाने सदरील मालमत्ता धारकांना सावकारांकडे कर्ज घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहेत.व असंख्य मालमत्ता धारक अडचणीत सापडले असल्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असल्याचे अनेकांनी बोलवून दाखविले आहेत.त्यामुळे सदरील प्ररकरणाकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी लक्ष देऊन मार्ग काढण्याची मागणीही करण्यात आली आहे.सदरील निवेदनावर छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी.मिसाळे व बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS