मादळमोही दि,२ (संतोष भारती):-
कोरोना संदर्भात शासनाने नियम घालुन दिले आसले तरी नियमाच पायामल्ली होत असुन वर्दळीच्या ठिकाणी नियम न पाळाताच मोठी गर्दी होत आहे, जनतेत कोरोना विषय दहशत असली तरी बाजार, लग्न समारंभच्या ठिकाणी नियम पाळले जात नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे,त्यामुळे कोरोना फैलाव होण्यास मदत होत आहे,एकीकडे लशीकरणामुळे जनतेला दिलासा मिळाला असला तरी आजाराचे गांभिर्य नसल्याचा अनुभव येत आहे,तापमाना बरोबरच रुग्ण संख्याचे आकडेही वाढत आहेत,शासनाच्या नियमाचा फैज्जा उडत असुन कडक कारवाई झाली तरच काही प्रमाणात अडकाठी होवु शकते अशी चर्चाही होत आहे,
तब्बल एक वर्षा पासुन कोरोना पिच्छा सोडविण्याचे नांवच घेत नाही,कोरोना रुग्ण संख्या वाढताच शासनाने कडक नियमाचे आदेश दिले आसले तरी या आदेशाची सर्रास पायामल्ली होत असुन सोशलडिस्टंन , मास्क न वापरणे, सनिटायझर ना वापरणे असे प्रकार सुरु आहेत,बाजार , समारंभत मोठी गर्दी होत असुन बनधास्त लोंक वावरत आहेत,त्यामुळे पुढिल काळात कोरोन आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव होवु शकतो,त्यासाठी प्रशासानाने कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे,नसता पुढिल काळ अडचणीचा ठरु शकतो,संसर्ग वाढला तर लाँकडाऊन होणार.हे ठरलेले आहे, त्यामुळे लोकांनी कशे वागावे हे ज्यांनी त्यांनी ठरवावे असा सूर पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनातुन निघत आहे, आपण कसे वागावे स्वतः च ठरवले तर संसर्ग फैलवणार नाही,हे सुज्ञ नागरीकांना समजणे आवश्यक आहे,सर्वचे जनजीवन विसकळीत होवु नये,लाँकडाऊन सगळ्याच्या अडचणीचे आहे,याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे,प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे लोकच आहेत, व आपल्यातील आहेत या कडे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे मतही प्रशासनातुन नोंदवले जात आहे,

COMMENTS