भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव कोव्हिड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नाइलाजाने रद्द करण्यात आला आहे.परंतु रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून 'संगीत शंकर दरबार' या फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवरुन मागील सोळा वर्षांतील निवडक स्मृतींना सलग तीन दिवस उजाळा दिला जाणार आहे.
याची सुरुवात आज होत असून आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता 'पूर्वसंध्ये'चा कार्यक्रम प्रसारित होणार आहे . या कार्यक्रमात शंकर महादेवन,स्वप्नील बांदोडकर,उषा मंगेशकर आणि लिटल चंप्स रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड , 'सारेगम फेम' राहुल सक्सेना,उर्मिला धनगर व छोटे सुरवीर मधील माहूरची स्वराली जाधव हिच्या सह चैतन्य देवडे, हर्षद नायबल, उत्कर्ष वानखेडे,सई जोशी व सक्षम सोनवणे इत्यादी बाल, युवा कलावंतांसोबत मान्यवरांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण,उपाध्यक्षा सौ.अमिताताई चव्हाण, सचिव श्री डी.पी. सावंत,सहसचिव श्री उदय निंबाळकर,कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर तथा संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि संयोजन समितीतील संजय जोशी,रत्नाकर अपस्तंभ, अपर्णा नेरलकर, ऋषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख,विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे छायाचित्रकार श्री विजय होकर्णे व बंधु यांनी केलेले चित्रीकरणाचे संकलन व मिश्रण स्वरेश देशपांडे यांनी केले आहे.

COMMENTS