मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील श्रम पर्यवेक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप गोलतकर हे दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे फिलँन्थ्रोपिक फाउन्डेशनच्या वतीने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रिन्सेस गोदीत ओपन अँपी थिएटर मध्ये त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार सोहळा साजरा झाला.
याप्रसंगी ऍड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, प्रदीप गोलतकर हे अजातशत्रू असून त्यांच्यामध्ये अनेक कलागुण आहेत. समाजाला उपयोगी पडणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी आपल्या सेवाकालावधीत अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुंदर सत्कार सोहळे केले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त श्री. सुधाकर अपराज यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, भारताच्या प्रमुख बंदरांमध्ये पूर्वी तीन लाख गोदी कामगार होते, आज पंचवीस हजार कामगार राहिले आहेत.तर मुंबई बंदरात पूर्वी चाळीस हजार कामगार होते, आज साडेपाच हजार कामगार राहिले आहेत व छत्तीस हजार पेन्शनर आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती होत नाही. सरकारच्या धोरणामुळे सर्व कामे कंत्राट पद्धतीने करून घेतली जातात. गोदीमधील नेतृत्वामुळे कामगारांना चांगले पगार व पेन्शन मिळत आहे. पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल व अँपी थिएटर येथे कामगार हिताचे रक्षण केले जाईल. प्रदीप गोलतकर यांनी आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे. त्यांच्यामध्ये अनेक कलागुण आहेत. त्याचा निश्चितच कामगारांना व समाजाला फायदा होईल.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव, नगरसेविका रेश्मा काळे, माजी नगरसेवक संजय सावंत, महेश पारकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ्य साहय्यक गोदी प्रबंधक इथापे, गोदी सुरक्षा उप प्रबंधक श्री.राजेंद्र गायकवाड, फिलँन्थ्रोपिक फौंडेशनचे माजी अध्यक्ष राजन भोसले, सुधाकर जाधव, मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी पातपेढीचे संचालक गजेंद्र हिरे, कस्टम युनियनचे संतोष पेडणेकर, सौ.प्रेरणा गोलतकर आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. प्रदीप गोलतकर यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व सुत्रसंचालन फिलँन्थ्रोपिक फॉउंडेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. विजय सोमा सावंत यांनी केले तर आभार श्री.बाळप्रताप सोरटे यांनी मानले. विविध संस्था, मित्र परिवार, नातेवाईक यांच्या वतीने प्रदीप गोलतकर यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास वरिष्ठ सुरक्षा अधिकारी श्री.मनोहर बेलेकर,वरिष्ठ सहाय्यक गोदी प्रबंधक श्री.चैतन्य राऊत,सहाय्यक गोदी प्रबंधक श्री. शशिकांत हांडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, दत्ता खेसे, निसार युनूस, बाळकृष्ण लोहोटे, मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक वसंत गावडे, बबन हाडवळे, जिजाभाऊ औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS