नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तालुका स्तरावरील तहसील, पंचायत समिती, कृषी, बँक व इतर शासकीय कार्यालयातील अधिकार्यांनी लाभार्थ्यांची कामे वेळेवर करावे, लाभार्थ्यांची कामे न केलेली तक्रार माझ्याकडे येऊ नये अन्यथा त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी कडक सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिले.
नायगांव तहसील प्रागंणात प्रशासन आपल्या दारी या आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आ. राजेश पवार यासह उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार वगवाड, बिडिओ फांजेवाड, जि. प. सदस्य पुनम पवार, पं.स.उपसभापती संजय पा. शेळगावकर, बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी कांबळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रस्तावना महेश जमदाडे यांनी मांडल्यानंतर जिल्हाधिकारी यासह उपस्थितांच्या हस्ते प्रसंगिक स्वरूपात काही जात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप, कुटुंब अर्थसहाय्यचा धनादेश, बेटी केअर कीटचे वाटप तर बचत गटांना एक लाखाचे धनादेश, शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळा, जनता हायस्कूल, व ब्लु ब्लेस इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश देण्यात आला, पुनम पवार , शेळगावकर यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले तर आ. पवार यांनी इतल्या महसूल व्यवस्थेना आपल्याच मर्जीत चालावे असे वाटते म्हणूनच लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे खडेबोल यावेळी व्यक्त करीत घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी रेती घाटांवर टिप्पर, जेसीबीची व्यवस्था करू असेही ते म्हणाले.
डॉ. इटणकर पुढे बोलताना म्हणाले की, प्रशासनावर विश्वास जनतेमध्ये कमी झालेला होता परंतु कोविड मध्ये वाढला असला तरी तो कायम विश्वास ठेवण्यासाठी तालुकास्तरावर आपण त्यांचे प्रश्न मिटवावे नागरिकांनी तक्रारीचा पाढा माझ्याकडे मांडल्यास मी आपली गय करणार नाही अशी कडक सूचना सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी दिली, यावेळी डॉ. के. हरिबाबु सर, भगवानराव लंगडापुरे, शंकर पाटील कल्याण, प्रा. जीवन चव्हाण, गंगाधर पा. कल्याण, अनिल सावकार यासह बचत गट, अंगणवाडी कर्मचारी महिला व सर्व स्तरातील कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. नंदगावकर यांनी केले.

COMMENTS