धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद येथे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुथ संपर्क अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सम्पर्क अभियान प्रमुख व जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर,भाजपचे माजी अध्यक्ष बाबाराव भालेराव, श्रीनिवास इनाणी, शैलेश पाटील, कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार व सर्व आघाडी व मोर्चा जिल्हाध्यक्ष व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सदर बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. स्वामी समर्थ मंदिराजवळील झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोटगंटीवार, भाजपा तालुका अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नालीकर, मराठवाडा सोशल मीडिया संयोजक साईनाथ शिरपुरे, ओबीसी सेल प्रमुख बालाजी चिंतावार, तालुका समन्वयक व संयोजक संजय पाटील शेळगावकर, शहराध्यक्ष रामेश्वर गंदलवार, तुकाराम पाटील, ललेश पाटील मंगनाळीकर, शंकर, अमित मुंदडा, अंकित गोधा, स्वामी रोषणगावकर, गिरीधर बुंदेले, संचालक दत्ताहरी पाटील आवरे, पोशेट्टी मदनूरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संयोजक संजय पाटील शेळगावकर यांनी केले तर आभार चक्रेश पाटील यांनी मानले.उद्या धर्माबाद च्या महावितरण कार्यालया समोर भाजपचे आंदोलन होणार आहे, अशी माहिती पुढे येत आहे

COMMENTS