बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब हे जनसामान्...
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब हे जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी शुक्रवार दि.5 फेब्रुवारी 2021 दुपारी 2.30 वा.पासुन राष्ट्रवादी भवन बार्शी रोड बीड येथे उपस्थित राहणार आहेत. जनसामान्याना आपल्या अडचणी मांडण्यासाठी मुंबई येथे जाणे शक्य नसते.त्यामुळेच त्यांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे.तरी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

COMMENTS