शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा

नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)             मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्या...


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)

            मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मनोहर तोटरे, उपप्राचार्य प्रा. संजीव डोईबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप केरुरे यांची विशेष उपस्थिती होती. यावर्षी कोविडच्या परिस्थितीमुळे जाहिर कार्यक्रमाला फाटा देऊन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने "शब्दशाहिरी" या भित्तीपत्रकाचा "कुसुमाग्रज विशेषांक" प्रा. डोईबळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

        याप्रसंगी प्रा. संजीव डोईबळे म्हणाले की, मात्तभाषेतून व्यवहार साधणे व आपल्या मनातील भावना प्रगट करणे ही काळाची गरज आहे. आपल्या मराठी भाषाचा डंका प्राचीन काळापासून ते आजपर्यंत चालू आहे. मराठी विभाग प्रमुख डॉ. राम धारासूरकर याप्रसंगी म्हणाले की, जगातील मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या ३० महत्त्वाच्या भाषेत आपल्या मराठी भाषेचा समावेश होतो. मराठी भाषेची परंपरा आणि परिस्थिती यावरही त्यांनी विवेचन केले.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागातील प्रा. डाॅ. केशव पाटील यांनी केले तर आभार प्रा. बसवेश्वर स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. अशोक अंधारे, डॉ. स्वानंद मुखेडकर, प्रा. नामदेव नागरगोजे, प्रा. मोईन काझी, डाॅ. महावीर उदगीरकर, प्रा. सुदाम फड, प्रा. माधव मंदेवाड, प्रा. गुरुनाथ बेळीकर आदी उपस्थित होते.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डाॅ. राम धारासूरकर, डाॅ. केशव पाटील, प्रा. बसवेश्वर स्वामी तसेच विद्यार्थी संपादक कु. अंजली ठाकूर, कु.वैष्णवी देवकत्ते, कु. शिवानी भिकनुरे, सचिन गायकवाड आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel