तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण.
≠===================
संतोष सुरोशे ,हादगाव तालुका प्रतिनिधी.
हदगाव तालुक्यातील मानवाडी फाटा येथे बहुजन टायगर प्रतिष्ठान यांच्या वतीनेआठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असून दहा दिवसीय श्रामणेर शिबिर तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त असे की अख्ख्या महाराष्ट्रात धम्म परिषदेच्या माध्यमातून भदंत भिखु संघाच्या मधुर वाणीतून धम्माचा प्रचार व प्रसार केला जातो. तसेच कवी गायकांच्या गीतातून मनोरंजन व प्रबोधन तर लेखक व व्याख्येत्यांच्या व्याख्यानमालेतून समाजास योग्य मार्गदर्शन करून दिशा दिली जाते.
याचाच एक भाग म्हणून दिनांक ३ मार्च 2019 रोजी नांदेड नागपूर हायवे वर हादगाव पासून चार किमी अंतरावर असलेल्या मानवाडी फाटा येथील संगमित्रा बुद्ध महाविहार ,चंद्रगुप्त नगर येथे बहुजन टायगर प्रतिष्ठान यांच्यावतीने आठव्या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद व श्रामनेर शिबिरांचे आयोजन करण्यात आले ,असून हादगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक चंद्रकांत पडघणे व त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त मुख्याध्यापीका रमाबाई चंद्रकांत पडघणे यांनी आपल्याला समाजाचे कामे काही देणे लागते हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून यांनी आपल्या मालकीच्या तीन एकर शेतामध्ये तथागत गौतम बुद्धाची डोळे उघडे असलेली मूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धोतर परिधान केलेल्या पूर्णाकृती पुतळा स्वतःच्या कमाईतून बसविण्यात आला आहे. त्या पुतळ्याचे उद्घाटन आणि जमिनीचा लोकार्पण सोहळा सरसेनानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचे आयोजक विद्रोही प्रबोधनकार, बहुजन टायगर प्रतिष्ठान अध्यक्ष कैलास राऊत यांनी केले असून या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेना मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमधाडे तर स्वागताध्यक्ष माध्यमिक शिक्षक दिलीप नवसागरे तसेच या कार्यक्रमासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे भाई दीपक केदार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी छायाबाई कांबळे ,मिलिंद चौरे निमंत्रित आहेत.या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून समाज चळवळीतील कलावंत, पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते ,समाजकार्यासाठी अहोरात्र धडपड करणारे समाजसेवक, तसेच समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर समाज भूषण या पुरस्काराने जाहीर सत्कार करून सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमामध्ये रात्रीला महाराष्ट्रातील स्वाभिमानी गायक गायिकाचा बुद्ध भीम गीतांचा संस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन केले आहे .या श्रामणेर शिबिरात व धम्मपरिषदेश असंख्य प्रमाणात बौद्ध उपासक-उपासिका यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य करावे .असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक कैलासजी सोनाळे व विशाखाताई नांदेडकर यांनी केले आहे या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील आहेत.
जाहिराती व बातम्या साठी संपर्क संतोष सुरोशे हदगाव तालुका प्रतिनिधी ,संपर्क नंबर 8669123136

COMMENTS