बुद्धभूमि परिसरात सभागृह बांधकामासाठी निधी देण्याची पालकमंत्र्यांना विनंती.

     राम दातीर 

 माहूर( प्रतिनिधी)माहूर शहरातील बुद्धभूमि परिसरात दलित वस्ती योजने अंतर्गत सभागृह देण्याची मागणी आकाश कांबळे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना दि.4 फेब्रु.रोजी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.         माहूर शहरात भगवान गौतम बुद्धाची भव्य मूर्ति आहे.तिथे असलेल्या भव्य पटांगणात सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.परंतु त्याठिकाणी सभागृह नसल्याने होणारे सर्वच कार्यक्रम उघड्यावर घ्यावे लागत आहेत .त्यामुळे आकाश कांबळे यांनी केलेल्या मागणीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनाही दिल्या आहेत.

टिप्पण्या