केज दि २(प्रतिनिधी) केज शहराजवळील बीड रोड लगत विशाल डेरी प्रांगणामध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. आयोजक रामकवर धनंजय चौरे, अर्चना...
केज दि २(प्रतिनिधी)
केज शहराजवळील बीड रोड लगत विशाल डेरी प्रांगणामध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. आयोजक रामकवर धनंजय चौरे, अर्चना विशाल चौरे यांच्या नियोजनातून कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुका ,शहर परिसरातून महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हळदी कुंकाच्या दरम्यान महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात दूध व दुधाचे पदार्थ याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.
स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेव आप्पा चौरे यांच्या सह परिवाराने परिश्रम घेतले

COMMENTS