बालाजी पाटील -
मुखेड तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी रमाकांत पाटील जाहूरकर यांची निवड नांदेडचे युवक जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी नुकतीच केली.रमाकांत पाटील यांनी जाहीर पणे ग्रामपंचायत मध्ये यशस्वी वाटचाल केली असून,युवकांत सक्रीय राहून जनसामान्यांचे काम केले आहे.शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन अनेक वेळा शासन दरबारी मांडून वेळ पडल्यास अनेकदा मोर्चे ही रमाकांत पाटील यांनी केले आहे.या सर्व त्यांच्या कार्याची दखल घेऊन रमाकांत पाटील जाहूरकर यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी निवडण्यात आले.
देशाचे नेते शरद पवार साहेब,प्रांत अध्यक्ष जयंत पाटील,युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब भाई शेख,शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे,जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे,वसंत सुगावे पाटील,शिवराज पाटील धोंडगे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील,बालाजी पाटील सांगवीकर,शरद पाटील मसलगेकर,विरेन पाटील बोडके यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला असून ही जबाबदारी यशस्वी पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल.
(रमाकांत पाटील जाहूरकर)

COMMENTS