*लोकतांत्रिक जनता दलाचे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण* .
माजलगाव दि 25 ( प्रतिनिधी ) तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमीनी संबंधी भूमिअभिलेख कार्यालय मध्ये मोठे गोंधळ निर्माण झालेले असून, भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी यांची मनमानी तात्काळ थांबविण्यात यावी.व माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील स.नं. 36, 37, 66, 174, 177, 179, 180, 211, 212, 368, 369 व पात्रुड येथील स.नं. 27, 28 , 53, 61, 93, 94, 95, 101, 102, 121, 10, 31, 32 , 56, 57, 76, 99 व वाघोरा येथील स.नं.54, 66, 57, 64, 65, 75, 96, 97, 98, 287, 288, 321, 99 या सर्व्हे नंबर मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण व बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार झालेले आहेत व या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधण्यात आलेले आहेत. यासंबंधी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी ,या प्रकरणी माजलगाव तहसील प्रशासनाकडून नायब तहसीलदार, पेशकार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देवून दिशाभुल केली जात आहे व या अधिकारी लोकांवर वरीष्ठ अधिकाऱ्यांचे कसलेच नियंत्रण नाही
या प्रकरणी मा.विभागीय आयुक्त (केंद्रेकर साहेब) तसेच मा.अल्पसंख्यांक मंत्री यांनी मा.जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करुन वेळोवेळी आदेशीत करुन सुध्दा व मा.उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांनी सुध्दा वेळोवेळी सूचित करुन माजलगाव तहसील प्रशासनाकडून याची कसलीच दखल घेण्यात येत नाही.
तरी माजलगाव तालुक्यातील मंदिर, मस्जिद अशा देवस्थानाच्या इनामी जमीनी संबंधी आता अहवाल न मागता निकाल देण्यात यावे.या प्रमुख मागणीसाठी आज दि 25 रोजी येथील उपविभागीय कार्यालया समोर लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी त्यांच्या कार्यकर्त्या समवेत बेमुदत उपोषण केले आहे

COMMENTS