हार, तुरे, शाल यांना बगल देऊन अनोखा स्तुत्य उपक्रम
==================================
केज/प्रतिनिधी
केज पंचायत समितीच्या सभापती सौ. परीमलाताई घुले यांचे पती विष्णू भाऊ घुले यांनी शनिवारी दुपारी दोन वाजता पंचायत समितीत केज शहरात नव्याने स्थापन झालेल्या झुंजार पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा मास्क व सॅनिटायझर वाटप करून अनोखा सन्मान करण्यात आला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की पंचायत समितीचे सभापती पती विष्णू भाऊ घुले यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने केज येथे नव्याने स्थापन झालेल्या झुंजार पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा सन्मान केला. सदैव तरुणांच्या सेवेसाठी व सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेणारे व सर्वांना सहकार्य करणारे विष्णू भाऊ घुले यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हणजेच शाल, पुष्पगुच्छ, हारतुरे, याला बगल देऊन सध्या राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले.
यावेळी सभापती पती विष्णू भाऊ घुले, चिंचोली माळी चे सरपंच सुनील बापू देशमुख, साळेगाव चे सरपंच कैलास पाटील, मांगवडगाव चे सरपंच रवी जाधव, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे, सचिव दत्तात्रय हंडिबाग सर, संघाचे सदस्य गोविंद नाना शिनगारे, दिनकर राऊत, प्रा. जावेद शेख, रमेश ईतापे, नंदकुमार मोरे, श्रीराम तांदळे, वाजेद शेख, मनोराम पवार, अनिल गलांडे यांचे सह सामाजिक अंतर पाळून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अभार प्रदर्शन उपसंपादक गोविंद नाना शिनगारे यांनी केले.

COMMENTS