राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )संत रविदास महाराज यांच्या ६४४ व्या जयंती निमित्य माहूर येथे आ.भा.गुरु रविदास समता परिषद शाखा माहूर च्या वतिने संघटनेच्या संपर्क कार्यालयात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अ.भा.गुरु रविदास समता परिषदेचे(ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष संजय बनसोडे,यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मंडळीनी अभिवादन केले.
यावेळी संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. यावेळी अ.भा.गुरु रविदास समता परिषदेचे(ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष संजय बनसोडे, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर लाड, अंबादास बनसोडे,प्रा.राजाराम गंदेवाड, अ.भा.गुरु रविदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अॅड. नितेश बनसोडे, सतीश भालके,मारोती कांबळे,दुर्गादास राठोड,वंसत राठोड,राम कांबळे, उमेश बोरनारे,आदींची उपस्थिती होती.

COMMENTS